Friday, 22 December 2017

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेणार - महादेव जानकर


            नागपूरदि. 22 : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात येईलअसे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
            सदस्य भारत भालके यांनी सोलापूर जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना दुधाचा कमी दर दिल्याबाबत प्रश्न विचारला होतात्याला उत्तर देताना श्री.जानकर म्हणालेराज्यातील 50 दूध सघांना नोटीस देण्यात आल्या असून कमी दर देणाऱ्या संघांवर राज्य शासन 79 अ अन्वये कारवाई करीत आहे. दुधाच्या संदर्भात पशु संवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल महिन्यात प्राप्त होईल. खाजगी दूध संघावर देखील कारवाई संदर्भात धोरण तयार करण्यात येत आहेअसे श्री.जानकर यांनी सांगितले.
            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीलसदस्य सर्वश्री गणपतराव देशमुखअजित पवारवैभव पिचड यांनी भाग घेतला.
0000

No comments:

Post a Comment