Friday, 22 December 2017

दुष्काळाबाबतच्या निकषांमध्ये बदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत दिल्लीला जाऊन प्रयत्न करणार - चंद्रकात पाटील

            नागपूरदि. 22 : दुष्काळ घोषित करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. त्यात बदल करुन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत दिल्लीला जाऊन प्रयत्न करण्यात येतील. मुक्ताईनगरबोधवड व अंमळनेर तालुक्यातील गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत असल्यास जुन्या निकषाप्रमाणे राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत करण्यात येईलअसे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
            सदस्य एकनाथ खडसे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री.पाटील म्हणाले कीज्या गावांची पैसेवारी 50 च्या आत आहे त्यांना दुष्काळ सदृश परिस्थिती असताना जी मदत केली जाते ती मदत केली जाईल. केंद्र शासनाने दुष्काळाबाबत मार्गदर्शक सूचना बदलल्याने त्यात बदल करण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल्.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार यांनी भाग घेतला.

No comments:

Post a Comment