नागपूर, दि.22 : वीज निर्मिती केंद्रांना आवश्यक कोळशाचा साठा उपलब्ध असल्याने राज्यात भारनियमन होणार नाही. असे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य आनंदराव पाटील यांनी राज्यातील भारनियमनाचा प्रश्न उपस्थित केला. श्री.बावनकुळे म्हणाले भविष्यात विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलर ऊर्जा तसेच पवन ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असून राज्यातील 40 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देण्याबाबत कार्यवाही करणार आहोत. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, शरद रणपिसे, भाई जगताप, जयंत पाटील, भाई गिरकर श्रीमती निलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment