नागपूर, दि.22 : चिंचोडी (ता.येवला जि.नाशिक) येथील नवीन औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधांच्या कामाच्या प्रशासकीय प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्याचे उद्योग राज्य मंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य श्री. जयंतराव जाधव यांनी औद्योगिक वसाहतीला पायाभूत सूविधा देण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. श्री.पाटील म्हणाले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने मुख्यालयास प्रस्ताव दिला असून त्यात रस्ते, जलवितरिता, पथदिवे, विद् युत उपकेंद्र आदी पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
००००
No comments:
Post a Comment