नागपूर, दि. 31 : सर्वोच्च न्यायालयामध्ये
(सिव्हिल अपील क्रमांक 82/83/84/2013 अन्वये) एक आदेश निर्गमित करतांना आदेशामध्ये
वैधानिक लेखापरीक्षणाअंती भरणा केलेले 20 टक्के लेखा परीक्षण शुल्क कृषी, पशुसंवर्धन,
दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित लेखापरीक्षकास देण्याबाबत
सूचना करण्यात आली आहे. यानुसार पदुम संस्थाच्या सबंधित सनदी / प्रमाणित लेखापरीक्षकांनी
20 टक्के लेखापरीक्षण शुल्काची माहिती विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (दुग्ध)
नागपूरद्वारे प्रशासकीय इमारत क्रमांक 2, दुसरा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर
यांचेकडे विनाविलंब सादर करावे, असे आवाहन विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (दुग्ध),
नागपूर यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment