Thursday, 1 February 2018

शिक्षण क्षेत्राला नवीन दिशा देणारा अर्थसंकल्प - शिक्षण मंत्री विनोद तावडे

अर्थसंकल्प प्रतिक्रिया

मुंबई दि. 1 : शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याच्या दृष्टीने शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करणारा अर्थसंकल्प आहे. डिजिटल शिक्षणावर भर देण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात सकारात्मक तरतूद करण्यात आली असून त्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात जागितक स्पर्धेत भारताचे शिक्षण अधिक उंचविण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची भरीव तरतुद करण्यात आली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार व उत्तम शिक्षण देण्याचा सकारात्मक विचार करताना आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी एकलव्य शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षणाला अधिक बळकटी मिळणार असून विद्यार्थ्या्ंना संशोधनासाठी नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्राला नवीन दिशा देणारा हा अर्थसंकल्प ठरेल.  
मुंबईची लाईफलाईनअसलेल्या लोकल रेल्वे वाहतुकीला अधिक भक्कम करण्यासाठी करण्यात आलेली भरीव तरतूद ही मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रासाठी आनंददायी आहे. यामुळे मुंबईच्या चाकरमान्यंसह राज्यातील कोट्य़वधी जनतेचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे.
००००



No comments:

Post a Comment