Tuesday, 27 February 2018

'दिलखुलास' मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिकांच्या प्रतिक्रिया





          मुंबई,दि. २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या बुधवार दि. २८ फेब्रुवारी रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.
            मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ ग्रंथसंग्राहक श्याम जोशी, संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रतिक्रिया व "भिलार पुस्तकांचे गाव" येथील अनुभव तसेच ज्येष्ठ  साहित्यिक  मधू  मंगेश कर्णिक आणि बाल साहित्यिक  डॉ. विजया वाड  यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलखुलास कार्यक्रमातून दिल्या आहेत.
0000

No comments:

Post a Comment