वृ.वि. 584
मुंबई, दि. 28 : विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे सांगितले. हा अहवाल सभागृह नेते श्री. पाटील यांनी सभागृहास वाचून दाखविला.
श्री. परिचारक यांनी केलेला खुलासा व सैनिकाबाबत क्षमायाचना व व्यक्त केलेली दिलगिरी विचारात घेऊन अनावधानाने केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहाची जनमाणसात असलेली प्रतिमा तसेच सर्वोच्च स्थान मलिन अथवा कलुषित करण्याचा हेतू दिसून येत नसल्याने, त्यांना आतापर्यंत दिलेली शिक्षा पुरेशी समजून त्यांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस समितीने केली होती.
***
No comments:
Post a Comment