मुंबई,दि.२८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास” कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संगीतकार कौशल इनामदार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दि. १ मार्च रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. साताराचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे
"भिलार पुस्तकांचे गाव" येथील अनुभव तसेच मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याबाबतचे आपले मत श्री. इनामदार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून व्यक्त केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment