नागरी कृती कार्यक्रम 2017-18 चा
समारोप थाटात
गडचिरोली,दि.31:- दुर्गम भागातील नागरिकांना, युवकाना त्यांच्या
आर्थिक प्रगतीसाठी कौशल्य विकासाचे धडे
देऊन स्वयंमपूर्ण करण्याचा मोलाचे काम
नागरी कृती कार्यक्रम 2017-18
अत्यंत स्तुत्य असा आहे. तसेच येथील पोलिस दलाने नागरिकांना उपजिविका साधन उपलब्ध
करुन देऊन जनतेत विश्वास निर्माण केला, याचा सकारात्मक परिणाम नक्षलवाद संपविण्यात
होत आहे. पोलिसांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन, जहाज बांधणी,
जलसंधारण व गंगाशुध्दीकरण खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
राखीव
केंद्रीय पोलिस दल तथा गडचिरोली पोलिस यांनी सयुक्तपणे राबविलेल्या सिवीक एक्शन प्रोग्राम
2017-18 च्या, पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणातील भव्य शामियानात
आयोजित समारोपीय कार्यक्रमात ते बोलत
होते.
यावेळी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद
अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, क्रिष्णा गजबे, अतिरिक्त पोलिस
महासंचालक कन्नकरत्नम, केंद्रीय पोलिस
दलाचे पोलिस उप महानिरीक्षक राजकुमार, नगराध्यक्ष योगिता पिपरे, शालु दंडवते व्यासपिठावर प्रामुख्याने उपस्थीत
होते.
पुढे बोलतांना गडकरी म्हणाजे की, राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा
अत्यंत श्रीमंत आहे, मात्र येथील नागरिक गरिबीचे जीवन जगत आहेत. त्यांना योग्य
मार्गदशन, दळणवळणाच्या सोयी, शेतीशी पुरक
लघु उद्योगाची जाणीव करुन देणे आपले कर्तव्य आहे.
याची दखल घेऊन प्रतिकुल परिस्थीतीत
नागरिकांच्या संरक्षणा सोबतच
त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी पोलिस विभागाने हा उपक्रम राबवून येथील जनतेच्या मनात शासन, प्रशानाच्या बाबतीत विश्वास निर्माण केला आहे.
याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री
हंसराज अहीर यांनी आपल्या विभागानी राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन डाव्या विचारसरणीला प्रतिबंध घालण्याचा जवानानी आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे त्यानी
सांगितले.
सिवीक एक्शन प्रोग्राम 2017-18
अंतर्गत युवकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, संगणक चालविण्याचे
प्रशिक्षण, कोसाउत्पादनाचे प्रशिक्षण दिले. त्याबाबतचे प्रमाणपत्र गडकरी यांच्या
हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी महिला आर्थीक विकास महामंडळाच्या अंतर्गत
असलेल्या बचत गटाना शिलाई मशिनचे वितरण
करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment