मुंबई, दि.२९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात 'बांधकाम कामगार विशेष नोंदणी' या विषयावर कामगार आयुक्त नरेंद्र पोयम यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. ३० मार्च आणि शनिवार दि. ३१ मार्च रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी वरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती वर्षा फडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियानाचे उद्देश, कार्यरचना व कामगारांच्या कल्याणासाठी आखण्यात आलेल्या विविध योजना, नोंदणीसाठी आवश्यक अटी व प्रमाणपत्रे, महिला व पुरुष कामगार आणि त्यांच्या पाल्यांना देण्यात येणारे विविध लाभ आदी विषयांची माहिती श्री. पोयम यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
000
No comments:
Post a Comment