नागपूर, दि. 28 : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (आत्मा) नागपूर यांच्या वतीने वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र (वनामती ) येथे ‘खरेदीदार-विक्रेता संमेलन’ नुकतेच संपन्न झाले.
खरेदीदार- विक्रेता संमेलनाचा उद्देश शेतकरी उत्पादक कंपन्यांशी व्यापर करण्याकरिता लागणारे भांडवल, शासन व बँकेसोबत समन्वय साधून विना व्याज, अल्प व्याज दर तसेच दर्जेदार शेतमाल पिकवून व त्यांना उत्तम पॅकिंग करुन थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी करावयाची उपाययोजनांबाबत कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. श्रीमती नलिनी भोयर यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ग्लोबल फ्रोजन फुडस् नागपूरचे प्रतिनिधी श्री . विनोद बकाल यांनी आवश्यक असलेला शेतमाल स्विट कॉर्न, वाटाणा, फुलकोबी याविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. यावर्षी रब्बी हंगाममध्ये शेतकरी उत्पादन कंपनी सोबत करार करुन 20 एकरावर उत्पादन झालेल्या स्विट कॉर्न खरेदी करण्याचा करार करण्यात आला. या करारामध्ये अंदाजे 5 लाख रुपयांची उलाढाल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ईव्हा एक्सपोर्टचे संदीप चव्हाण यांनी नागपूर येथून आखाती देशामध्ये निर्यात होत असलेला भाजीपाला, यामध्ये प्रामुख्याने भेंडी, हिरवी मिरची, कारले, दुधी भोपळा यांच्या गुणवत्ते विषय माहिती दिली. तसेच भाजीपाला मागणीचे वेळापत्रक दर ठरवून त्याबाबत करार करण्याबाबत आश्वासन दिले.
रब्बी हंगामात श्री. कृष्णा फार्मर प्रोड्यूसर कंपनी,झिरो माईल फॉर्मर प्रोडयुसर कंपनी, कोंणतलापूर कृषी फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी, वाकोडी फॉर्मर प्रोड्यूस कंपनी या शेतकरी उत्पादन कंपन्यांनी 100 एकरावर निर्यातक्षम भेंडीची लागवड केली आहे. डॉ. नारायण लांबट यांनी जवस उत्पादक व खरेदीदार यांनी कंपन्यांशी करार करुन पुढील रब्बी हंगामात 250 एकरावर जवस लागवड करुन उत्पादित जवस करार पद्धतीने खरेदी करण्याची तयारी दर्शविली.
वाशिम जिल्ह्यातील कृषी माऊली शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक दिलीप फुके यांनी बिजोत्पादनाचे टप्पे याविषयावर सविस्तर माहिती दिली. कळमेश्वरचे प्रगतीशील शेतकरी प्रमोद गौतम यांनी दालमिल व्यवसायातील बारकावे तसेच सोयाबीन, तूर, हरभऱ्याचे बीजोत्पादन करुन विक्री करण्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. विभागीय कृषी सहसंचालक नारायण सिसोदे यांनी शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन आर. पी. मेश्राम यांनी तर आभार अरुण कुसळकर यांनी मानले.
****
No comments:
Post a Comment