नागपूर, दि. 3 : मराठा
समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागसलेपणा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून बुधवार
दि. 11 एप्रिल रोजी रविभवन येथे जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
आयोगाचे अध्यक्ष
सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी रविभवन
येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
या सुनावणीदरम्यान व्यक्ती,
संघटना व सामाजिक संस्थेमार्फत सादर निवेदनाद्वारे मराठा समाजाचे सामाजिक,
शैक्षणिक व आर्थिक मागसलेपणासंबंधीची माहिती संकलीत करण्यात येईल. जनसुनावणीमध्ये
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी.
गायकवाड यांच्यासह तज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, सदस्य सचिव डी. डी. देशमुख,
सदस्य प्रा. चंद्रशेखर देशपांडे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रमोद येवले, रोहिदास
जाधव, सुधीर ठाकरे, डॉ. सुवर्णा रावळ, प्रा. राजाभाऊ करपे, डॉ. भूषण व्ही. कर्डिले
उपस्थित राहतील.
नागपूर महसूल क्षेत्रातील
व्यक्ती, संस्था, संघटनांनी लेखी पुराव्यासह तसेच ऐतिहासिक माहिती निवेदनाद्वारे
आयोगासमोर मांडावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी.
डी. देशमुख यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment