Monday, 2 April 2018

‘शिधा पत्रिकांचे डिजिटायझेशन’ 'जय महाराष्ट्र'मध्ये आज दिलीप शिंदे


मुंबई,दि.2:माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात शिधा पत्रिकांचे डिजिटायझेशनया विषयावर शिधावाटप व नागरी पुरवठा संचालक, दिलीप शिंदे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत उद्या मंगळवार दि. 3 एप्रिल रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8या वेळेत प्रसारीत होणार आहे. विभागीय संपर्क अधिकारी अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या शिधावाटप व नागरी पुरवठा विभागाची कार्यप्रणाली, रास्त भाव धान्य दुकानामध्ये बसविण्यात आलेले पॉईंट ऑफ सेल  उपकरण, बायोमट्रिक पद्धतीने धान्य वितरण, शिधापत्रिकाबरोबर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक सिडिंग तसेच ई लिलावाद्वारे साखर खरेदीच्या महाराष्ट्र पॅटर्न आदी विषयांची माहिती श्री. शिंदे यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment