मुंबई, दि.2 :राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत
दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे.आजपर्यंत
१६७ तूरकेंद्रावर एक लाख १६ हजार २४५
शेतकऱ्यांची १३ लाख ९९ हजार १५१ क्विंटल तूर
खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज
दिली.
तूर
खरेदीचा काळ तीन महिने असून आतापर्यंत ४ लाख ३ हजार ३७६ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी
नोंदणी केली आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या
मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही पणन मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment