मुंबई, दि. 2 : तुर्कस्तान चे नवी दिल्लीस्थित राजदूत साकीर टोरुनलार यांनी आज
त्यांच्या शिष्टमंडळासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासमवेत गाम्झे
काडेरोग्ल्यू, सालेह उनवर आदी मान्यवर उपस्थित
होते.
यावेळी उभय देशांमध्ये करता येऊ शकणाऱ्या उद्योग- व्यापाराबाबत चर्चा झाली.
यात प्रामुख्याने शिपिंग, इलेक्टॉनिक्स, अन्न प्रक्रिया उद्योग, कॉफी उत्पादन यासारख्या विषयांचा समावेश होता. दोन्ही देशात द्विपक्षीय
व्यापारवृद्धीच्या अनुषंगाने यापूर्वीच चर्चा झाली असून पेट्रोलियम पदार्थ, खनिजे, खनिज
तेल, ग्रॅनाईट, वस्त्रोद्योग, सेंद्रीय
रसायने सोने, खत, मार्बल, पॉवर जनरेटिंग मशिन्स
याअनुषंगाने दोन्ही देशात आयात-निर्यातीस असलेल्या संधीवर यावेळी चर्चा करण्यात
आली. तुर्कस्तानमध्ये होणाऱ्या निर्यातीत ५० ते ६०टक्के निर्यात ही महाराष्ट्रातून
होत आहे. सीआयआय किंवा फिकीच्या सहकार्याने दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धीसाठी
समन्वय साधणारी एखादी स्वतंत्र यंत्रणा किंवा कार्यालय महाराष्ट्रात स्थापित
करण्याच्या शक्यतेबाबतही आजच्या बैठकीत विचार झाला.. भारत आणि तुर्कस्तानमध्ये
विमान सेवेच्या माध्यमातून संपर्क गतिमान करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
००००
No comments:
Post a Comment