मुंबई, दि. ३ : मर्चंट
नेव्हीमध्ये उपलब्ध असलेल्या संधीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी
प्रदर्शनांचे आयोजन करण्यात यावे,असे आवाहन मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय मेरीटाईम दिनानिमित्त मंत्रालयात जहाज बांधणी विभागातर्फे आयोजित
करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते
बोलत होते.
मुख्य सचिव म्हणाले, मर्चंट नेव्हीमध्ये जास्तीत जास्त नोकरीच्या संधी निर्माण
करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने कौशल्य शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल.
मर्चंट नेव्ही विषयी जनजागृती होणे आवश्यक असून जहाज बांधणी विभागाने ठिकठिकाणी
अशा प्रदर्शनांचे आयोजन करणे गरजेचे आहे.
प्रदर्शनातील वेगवेगळ्या स्टॉलला मुख्य सचिवांनी भेट
देऊन माहिती जाणून घेतली. याशिवाय येथील छायाचित्र प्रदर्शनाची प्रशंसा केली.
५ एप्रिल हा
राष्ट्रीय मेरिटाईम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जहाज
बांधणी विभागमहासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली मेरिटाईम प्रदर्शन समितीमार्फत
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात या प्रदर्शनाचे आयोजन केले असून उद्यापर्यंत ते
सुरु राहणार आहे.
००००
No comments:
Post a Comment