मुंबई 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीच्या दिलखुलास कार्यक्रमात शासकीय दंत महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांची 'तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम' या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दि. 1 आणि 2 जून रोजी सकाळी 7:25 ते 7:40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शुभांगीनी पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी जगभर दिन पाळला जातो. या निमित्ताने समाजात जनजागृती होण्यासाठी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, तंबाखू पासून होणारे विविध कर्करोग, त्यांची लक्षणे व उपचार तसेच तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळविण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत माहिती डॉ. पवार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment