मुंबई दि. 31 : ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कृषीविषयक आणि सहकारक्षेत्रातील प्रश्नांची खरी जाण असणा-या नेत्याला आपण कायमचे मुकलो आहोत, अशा शब्दात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फुंडकर यांना श्रध्दांजली वाहिली.
श्री. फुंडकर यांनी गेली अनेक वर्षे पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन निघणे अशक्य आहे, असेही श्री. तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0000
No comments:
Post a Comment