मुंबई, दि. 31; ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यावर भर देणारे आणि कृषी क्षेत्रातील आव्हानांची जाण असणारे राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने मंत्रिमंडळातील एक जाणकार सहकारी हरपला आहे. गेली चार दशकं राजकारणात सक्रिय असलेल्या भाऊसाहेबांचे ग्रामीण भागातील जनते सोबत विशेष ऋणानुबंध होते. कृषी, सहकार या विषयावर त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
***
No comments:
Post a Comment