मुंबई, दि. 31; राज्याचे कृषिमंत्री पांडुरंगजी उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने राज्याने एक ज्येष्ठ आणि द्रष्टा नेता गमविला आहे. राज्यातील कृषी, सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेल्या भाऊसाहेबांनी कृषी मंत्री म्हणून राज्याला दिशा दाखविणारे महत्वपूर्ण निर्णय घेतले. विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
***
No comments:
Post a Comment