मुंबई,दि. 31 : मार्केटिंग फेडरेशन, कृषी मंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ यांनी एकत्रित येवून पंजाब हरियाणाच्या धर्तीवर राज्यातॲग्रो-प्रोसेसिंग, ब्रँडींग व मार्केंटिंग कार्यप्रणालीचा वापर करून याद्वारे राज्यातील खरेदी विक्री संघ, शेतकरी उत्पादक संस्था, महिला बचत गट व वि.का.स. सोसायट्यांचे सक्षमीकरण करणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
अटल महापणन विकास अभियानअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन व सभासद संस्थाच्या सक्षमीकरणासंदर्भात पंजाब-हरियाणा दौरा सादरीकरणासंदर्भात श्री.देशमुख यांच्या दालनात काल आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार,महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, विदर्भ पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. हरिबाबु तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, पंजाब, हरियाणा येथील मार्केटिंग फेडरेशन व सभासद संस्था यांनी मोठया प्रमाणात प्रगती केली आहे. कडधान्य,तेलबिया,गहु,तांदुळ यापासून विविध प्रकारची तयार केलेली उत्पादने जागतिक स्तरावर पोहचली आहेत. त्यांनी अन्नधान्य खरेदी बरोबर, कृषी निविष्ठा पुरवठा, अग्रो-प्रोसेसिंग, ब्रँडींग व कृषी उत्पादनांचे मार्केंटिंग असे विविध व्यवसायिक उपक्रम राबविले आहेत.
No comments:
Post a Comment