मुंबई, दि. 31 : राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. श्री फुंडकर हे लोकनेते आणि समर्पित लोकप्रतिनिधी होते. कृषिमंत्री असताना ते मला नियमितपणे भेटत. शेतकर्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती व त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक इच्छा होती. फुंडकर यांचे संघटन कौशल्य सर्वज्ञात होते. त्यांनी जनतेशी असलेली आपली नाळ आयुष्यभर जपली. संसद सदस्य तसेच विधानमंडळाचे सदस्य या नात्याने त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक उत्तम संसदपटू गमावला आहे. त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहतो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या शोकसंवेदना कळवतो,असे विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment