मुंबई, दि. 31 : मंत्रिमंडळातील माझे सहकारी पांडुरंग ऊर्फ भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन झाले यावर विश्वास बसत नाही. त्यांचे असे अचानक जाणे मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात कधिही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे,
कृषी व फलोत्पादन मंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरिश बापट यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
***
No comments:
Post a Comment