Wednesday, 27 June 2018

मंत्रिमंडळ निर्णय : महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमाच्या तीन कलमांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता


 महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम-1961 मधील कलम 17(3), 18(2) 23 अ या तीन कलमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणेनंतर या अधिनियमास महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी (सुधारणा) अधिनियम 2018 असे संबोधण्यात येईल.
राज्यातील आयुर्वेद व युनानी वैद्यक व्यावसायिकांच्या नोंदणी, नियमन, पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 नुसार महाराष्ट्र भारतीय औषध परिषद ही संस्था अस्तित्वात आली आहे. परंतु या अधिनियमांमधील कलमे ही बऱ्याच आधीची असल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला आहे.  
कलम 17(3) व कलम 18अ(1) मध्ये निश्चित केलेल्या शुल्काऐवजी राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करीलअशी सुधारणा करण्यास तसेच कलम 23अ(1)(अ) मधील विद्यमान तरतुदी पूर्णपणे बदलून त्या सुधारित करण्यास मान्यता देण्यात आली.
याबरोबरच महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 मधील कलम 23 अ (1) (ब) व 23 अ(1)(ब) व 23 अ (1)(क), ही कलमे कालबाह्य झाल्यामुळे ती वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे.
-----०-----

No comments:

Post a Comment