* योजनेच्या माहितीपटाचे विमोचन
नागपूर दि.27 : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी शेततळे, फळबाग योजनेसह ग्राम विकासासाठी विविध योजनांचा समावेश असून या सर्व एकत्रित योजना प्रत्येक गावापर्यत पोहोचवून विकास योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
बचत भवन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच ग्रामीण जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी योजनेतील लाभार्थ्यांच्या मुलाखती तसेच योजनेबद्दल माहितीपटाची तसेच सोशल मिडियासाठी लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष देशमुख, डॉ. मिलींद माने, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, मुख्य वन संरक्षक मल्लिकार्जून, शिक्षण समिती सभापती उकेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदी उपस्थित होते.
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यात अहिल्यादेवी सिंचन विहिर उपक्रमांतर्गत 2 हजार 131 विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले असून कल्पवृक्ष फळबाग लागवडीमध्ये 1 हजार860 निर्मल शौचालय, 4 हजार 270, नंदनवन वृक्षलागवड अंतर्गत 2 हजार 848 त्यासोबतच निर्मल शोष खड्डे, अमृत शेततळे, स्मशानभूमी सुशोभिकरण, ग्रामपंचायत भवन, घरकुल योजना आदी योजनेसोबतच वैयक्तीक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. या योजनेची यशोगाथा लघुपटाच्या मार्फत सर्व जनतेपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सर्व जनतेने घ्यावा असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वागत करुन समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. लघुपटाच्या माध्यमातून तालुकास्तरावर सुरु असलेल्या कामासंदर्भातील विकास गाथा जनतेपर्यत पोहोचावी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. हा माहिती पट व लघुपट जिल्हा माहिती अधिकारी नागपूर यांनी तयार केला असून यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये यांनी मार्गदर्शन केले आहे.
प्रारंभी उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये यांनी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या माहिती पटाच्या निर्मितीबद्दल माहिती दिली. आभार जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी मानले.
*****
No comments:
Post a Comment