Tuesday, 26 June 2018

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन




मुंबई, दि. 26 : आरक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तआज विधानभवन येथे माजी आमदार मधु चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, उपसचिव राजेश तारवी यांच्यासह विधानमंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनीही गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
००००

No comments:

Post a Comment