Tuesday, 26 June 2018

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन



मुंबई, दि.२६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एका दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आज सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment