Wednesday, 1 August 2018

'दिलखुलास' कार्यक्रमात पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा आणि जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे



            मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात पालघर जिल्ह्याची निर्मिती ते सद्यस्थितीया विषयावर आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा  आणि पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची  मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून गुरुवार, दि. २ आणि शुक्रवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत पत्रकार सुरेश ठमके यांनी घेतली आहे.
            1 ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा निर्मितीला चार वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगाने  जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठीचे प्रयत्न, स्थानिक नागरिकांसाठी रोजगारनिर्मिती, आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी, शेतक-यांसाठी तसेच पर्यटन विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, सिडकोमार्फत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्प, जिल्हा विकासासाठी करण्यात आलेले सामंजस्य करार याबाबतची माहिती  दिलखुलास या कार्यक्रमातून श्री. सवरा आणि श्री. नारनवरे यांनी दिली आहे.
०००० 

No comments:

Post a Comment