नागपूर दि.29 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा
फेब्रुवारी-मार्च 2019 करीता नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त
झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजना व तुरळक विषय
घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवार, दिनांक
1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने आवेदने सादर करता येईल.
नियमित शुल्कासह कला, शास्त्र,
व वाणिज्य शाखेतील नियमित विद्यार्थी दि. 1 ते 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करु शकतील. पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजना व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणारे
विद्यार्थी दि. 22 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु
शकतील. याशिवाय सर्व विद्यार्थी विलंब शुल्कासह दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करु
शकतील.
नियमित तसेच विलंब शुल्कासह प्राप्त अर्जाची रक्कम
चलनाद्वारे बँकेत जमा करण्यासाठी महाविद्यालयांना दि.12 ते 17 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन
करण्यासाठी तसेच अधिक माहितीकरिता मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment