Saturday, 1 September 2018

गावातील विद्युतविषयक अडचणींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात 600 ग्राम विद्युत व्यवस्थापक

                                               * राज्यातील पहिल्या उपक्रमांला नागपूरपासून सुरुवात
                                                               * कौशल्य विकासांतर्गत प्रशिक्षण
                                                    * राज्यात 23 हजार ग्राम विद्युत व्यवस्थापकांची जाळे
                                                    * महावितरणतर्फे मिळणार मानधन
            नागपूर, दि. 1 :   ग्रामीण भागात विद्युत विषयक अडचणी सोडविण्यासाठी  तसेच महावितरणमार्फत पुरविण्यात येणाऱ्या काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रान्चायझी म्हणून काम करण्यासाठी ग्राहकांना आवश्यक सेवा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्यात आली असून यांतर्गत  पहिल्या 600 युवकांच्या तुकडीला कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे.
            महावितरणतर्फे सदर येथील नागपूर शहर मंडळ कार्यालयात प्रशिक्षण  सहा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी महावितरणचे कार्यकारी संचालक मानव संसाधन चंद्रशेखर येरमे, प्रादेशकि संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता दिलीप घुगल,अधीक्षक अभियंता मनीष वाट, नारायण आमधरे, बंडू वासनिक आदींच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे.
            ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवेसाठी  गावाच्या समूहाकरिता लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु  यामध्ये बिघाड झाल्यास किंवा दुरुस्ती करायची असल्यास तातडीने सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातच अडचणींचे तातडीने निराकरण कसे व्हावे यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापक निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्राम विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत  फ्रान्चायझी म्हणून काम करणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आयटीआय झालेल्या उपयुक्त व क्षमता असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या राज्यात 23 हजार ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
            ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून निवड केलेल्या व्यक्तींना महावितरण कंपनीतर्फे सहा दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार असून नागपूर जिल्ह्यातील या सुमारे 600 प्रशिक्षणार्थ्यांना येत्या  3 सप्टेंबरपासून प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे. यासाठी महावितरणतर्फे प्रतिग्राहक 9 रुपये याप्रमाणे उत्पन्न किंवा 3 हजार रुपये मानधन महावितरण कंपनीमार्फत देण्यात येणार आहे.
            ग्रामीण भागातील  विद्युत ग्राहकांच्या सुरक्षेसोबतच गावामध्ये उद् भवणाऱ्या विद्युत विषयक अडचणींचे निराकरण तातडीने करणे शक्य व्हावे यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुषंगाने ग्राम विकास विभागातर्फे ग्राम पंचायतींनी  फ्रान्चायझी म्हणून काम करणार आहे. राज्यातील 3 हजार लोकसंख्यापर्यंतच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतस्तरावर आवश्यक सेवा पुरविण्यात येणार आहे. यामध्ये मीटर रिडिंग घेणे, वीज देयके वाटप करणे, ब्रेक डाऊन अटेंड करुन सप्लाय पूर्ववत करणे, रस्त्यावरील दिवाबत्तीची देखभाल, दिवे बदलविणे, नवीन जोडणीचे कामे, थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणे आदी कामे ग्राम विद्युत व्यस्थापकांमार्फत करण्यात येणार आहे.
            ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या निवड प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होवून ग्राम विद्युत व्यवस्थापकांना जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत महावितरणला व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणून मान्यता देण्यात आली असल्याची जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक प्रवीण खंडारे यांनी दिले.
****

No comments:

Post a Comment