'स्क्रब
टायफस आणि अन्य साथीचे रोग : असा करू मुकाबला'
मुंबई, दि.
6 : माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात 'स्क्रब टायफस आणि अन्य साथीचे रोग : असा करू मुकाबला ' या
विषयावर मंत्री डॉ. दीपक सावंत यांची विशेष मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व
केंद्रांवरून शुक्रवार दि. ७
आणि शनिवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी
ही मुलाखत घेतली आहे.
राज्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाने उचललेली ठोस पाऊले, पावसाळयात
साथीचे आजार उद्भवू नये यासाठी आरोग्य विभागाने घेतलेली खबरदारी, स्वाईन
फ्ल्यू, लेप्टो, डेंग्यू, स्क्रब टायफस या आजाराबाबत घ्यावयाची काळजी, स्वाईन
फ्ल्यूचा प्रादूर्भाव रोखण्याबाबत तसेच विषाणूजन्य रोगांच्या अभ्यासासाठी
उभारण्यात आलेली व्हॉयरॉलॉजी प्रयोगशाळा याबाबतची माहिती डॉ.सावंत यांनी दिलखुलास
कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment