मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात महात्मा गांधीजींच्या विचारांचे अभ्यासक अशोक चौसाळकर आणि लेखक तथा अभ्यासक अरुण खोरे यांची "महात्मा गांधीजींचे विचार व कार्य" या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. १ आणि मंगळवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंती निमित्त विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा २ ऑक्टोबर हा जन्मदिवस जगभरात'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. गांधीजींच्या जीवनातील अजरामर तत्वे, त्यांचे कार्य, मूल्ये आणि साहित्य तसेच गांधीजींचे विचार आणि तत्वांचा वारसा पुढे नेण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांचे प्रयत्न याबाबत माहिती श्री. चौसाळकर आणि श्री. खोरे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment