नागपूर, दि.6 : सार्वजनिक न्यास नोंदणीअंतर्गत धर्मदाय
रुग्णालयाच्या यादीमध्ये माधव नेत्रालय आय इंस्टीट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर येथे
रुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरामध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आल्या असल्याची माहिती धर्मदाय सहआयुक्त आ. सु. कोल्हे यांनी दिली.
धर्मदाय रुग्णालयाच्या यादीत समावेश असलेल्या
रुग्णालयामध्ये उच्च न्यायालयाच्या योजनेप्रमाणे दूर्बल घटकातील रुग्णांना मोफत व
सवलतीच्या दरामध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून यासाठी
वार्षिक उत्पन्न 85 हजार रुपये अथवा त्यापेक्षा कमी असणाऱ्या निर्धन रुग्णांना
मोफत तसेच वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपये अथवा त्यापेक्षा कमी असलेल्या
दूर्बल रुग्णांना सवलतीच्या दरात उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यासाठी तहसिलदाराने दिलेले उत्पन्नाचे
प्रमाणपत्र, शिधापत्रिका अथवा दारिद्रय रेषेखालील पत्रिका इत्यादी कागदपत्राची
पुर्तता करणे आवश्यक आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मदाय
आयुक्त आ. सु. कोल्हे यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment