महाविद्यालयांना
सूचना
नागपूर, दि.6 : अनुदानित, विनाअनुदानित, व्यावसायिक,
अव्यावसायिक महाविद्यालयातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी,
प्रदानासाठी महाईस्कॉल ही जुनी संगणक प्रणाली येत्या दोन दिवसात बंद करण्यात येणार
आहे. त्यामुळे मागील वर्षापर्यंतची महाईस्कॉल संगणक प्रणालीशी संबंधित सर्व कामे
तात्काळ पुर्ण करुन डेटा संरक्षित करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक
आयुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी
संदर्भात सत्र 2017-18 चे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज 15 सप्टेंबर 2018 च्या आत या
कार्यालयात सादर करुन पात्र अर्ज मंजूर करुन घ्यावे. जुनी संगणक प्रणाली बंद
झाल्याने किंवा 2017-18 चे अर्ज कार्यालयास सादर करण्यात दिरगांई केल्याने
विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी महाविद्यालयीन
प्राचार्याची असेल याची नोंद घ्यावी, असेही सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment