Saturday, 1 September 2018

राज्यपालांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या अंधेरी शाखेचे उद्घाटन

            मुंबई, दि. 1 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवन येथून इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या अंधेरी शाखेचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पोस्ट खात्याच्याआर्थिक समावेशन’ या विषयावरील विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आलेतसेच पोस्टाच्या पाच खातेधारकांना बँकेच्या क़्युआर कार्डचे वाटप करण्यात आले. 
एकशे पासष्ट वर्षांची गौरवशाली परंपरा असलेले पोस्ट खाते भारतीय लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असून विश्वासपारदर्शकता व लोकसेवा ही पोस्ट खात्याची वैशिष्टे आहेत. देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणारी ही संस्था असून पोस्ट पेमेंटस बँकेमुळे बँकिंग सेवा देखील सामान्य लोकांच्या दारात पोहोचतीलअसा विश्वास राज्यपालांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. पोस्ट पेमेंटस बँकेमुळे लोकांना अनेक बिले घरबसल्या भरता येतीलअसे देखील राज्यपालांनी सांगितले.   
कार्यक्रमाला खासदार गोपाल शेट्टीमुंबई परिक्षेत्राचे प्रधान पोस्ट मास्तर जनरल गणेश सावलेश्वरकरपोस्टसेवा मुख्यालय येथील निदेशक सुमिता अयोध्याडबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment