मुंबई, दि. २८ : उद्योग क्षेत्राला
चालना देण्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात औद्योगिक धोरण राबवित आहे. या
धोरणांचा कॉर्पोरेट संचालक संस्थेने (IOD) उद्योग वाढीसाठी सहभाग वाढवून त्याचा लाभ
घ्यावा,
असे
आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मुंबई शेअर बाजार येथे ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड
न्यू रिफॉर्मस’
या
विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी
केले. यावेळी संचालक संस्थेचे अध्यक्ष
जे.एस.अहलुवालीया, निनाद
करपे,
आशिष
चव्हाण आदी उपस्थित होते.
संचालक संस्था
देशभरातील संचालक मंडळांना प्रशिक्षण देते. तसेच नवनवे उद्योग सुरु करण्यासाठी
प्रोत्साहन देते. या संस्थेने राज्य शासन राबवित असलेले विविध औद्योगिक धोरणांचा
आभ्यास करुन आपला सहभाग वाढवावा. संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी राज्य शासनासोबत
औद्योगिक गुंतवणुक आणि राज्यातील रोजगार
निर्मिती संदर्भात चर्चा करावी, या समन्वयांतून उद्योग क्षेत्राला चालना मिळून नवीन
उद्योग उभारणीस हातभार लागेल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र
गुंतवणुकीचे केंद्रबिंदू आहे. सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात असून आयआयटी, कौशल्ये विकास केंद्र
तसेच अभियांत्रिकी शाखांमधून उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ मोठ्या
प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार महाराष्ट्राला पसंती देत
आहेत. एक खिडकी योजना सुरु असल्याने
उद्योग उभारणे सुलभ झाले आहे, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment