Thursday, 6 September 2018

स्क्रब टायफस नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेनी दक्ष राहावे - डॉ. संजीव कुमार


                     * आयुक्तांनी घेतला स्क्रब टायफसचा प्रतिबंधाचा आढावा
                     * औषधांचा मुबलक साठा

       नागपूर, दि.06 :  स्क्रब टायफस आजाराचा वाढता प्रभाव पाहता संशयीत रुग्णांवर तातडीने उपचार करा तसेच स्क्रब टायफस आजाराबाबत  नागरिकांनी घाबरुन न जाता  वेळीच उपचार करा.वैदयकीय महाविदयालय व विविध आरोग्य संस्थेत उपचारासाठी आवश्यक औषध उपलब्ध्‍ करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, उपायुक्त महसूल सुधाकर तेलंग, मेयोचे अधिष्ठाता डॉ.अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता  डॉ. सु. य. राऊत, डॉ. अर्चना अहेर, डॉ. शर्मिला राऊत, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई तसेच संबंधित आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
साधारणता नागपुरातील शासकीय व खाजगी दवाखान्यामध्ये 70 रुग्ण भरती होते. त्यापैकी काही रुग्णांची प्रकृती बरी होऊन ते घरी परतले आहेत. सध्या 46 रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत.  या  आजाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करून वेळीच उपचाराबाबत मार्गदर्शन करा अश्या सुचनाही डॉ.संजीवकुमार यांनी दिल्यात.
 स्क्रब टायफस आजाराचे रुग्ण शहरी व ग्रामीण भागात आढळत असून सध्या वातावरणातील संमीश्र बदलामुळे डेंगी, स्वाईन फल्यु असे आजार  होण्याची शक्यता लक्षात घेवून उपचाराला प्राधान्य दयावे. यासाठी ग्रामीण भागात किटकनाशक फवारणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी दिली. स्क्रब टायफसचे रुग्ण हे अन्य राज्यातुन देखील उपचारासाठी येथे आले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या आजारावर ॲजीथ्रोमायसीन  व डॉक्सीसायक्लीन ही औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. शासकीय वैदयकीय महाविदयालय व इंदिरा गांधी शासकीय  वैदयकीय महाविदयालयात रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीच्या अंतीम वर्षाला तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत लवकरच आपण स्वत: संवाद साधणार असल्याचे विभागीय आयुक्त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी माता व बाल आरोग्य याविषयी सखोल चर्चा केली.
*****

No comments:

Post a Comment