Thursday, 6 September 2018

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमानी योजनेसाठी अर्ज आमंत्रित


                                                                                                 
नागपूर 6 :  सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना 100 टक्के अनुदानावर मेाफत शेतजमीन उनलब्ध करुन देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने 14 ऑगस्ट 2018 रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर लाभार्थी हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना द्रारिद्र रेषेखालील भूमिहिन कुटुबांना जमीन  उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
4 एकर कोरडवाहू जिरायती जमीन  कमाल रुपये 5 लाख प्रती एकर किंवा 2 एकर ओलीताखालील बागयती  जमीन  किंमत कमाल रुपये 8 लाख प्रती एकर जमीन उपलब्ध राहील. लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असतील. लाभार्थी द्रारिद्ररेखालील भूमीहीन असावा. लाभार्थ्यांचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 60 असावे. द्रारिद्र रेषेखालील भूमीहीन परितक्त्या स्त्रिया द्रारिद्र रेषेखालील विधवा  तसेच पात्र लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाल कल्याण विभाग भंडारा यांच्या कार्यालयाकडे 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****

No comments:

Post a Comment