Saturday, 1 September 2018

'दिलखुलास' कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले


मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'ज्येष्ठ नागरिक धोरण' या विषयावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सोमवार  दि. ३ आणि मंगळवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
वृध्दांच्या संरक्षणासाठी आणि त्यांची आर्थिक क्षमता विकसित करण्यासाठी राज्यशासनाने विशेष उपक्रम राबविले आहेत, वृध्दाश्रमातील वृध्दांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण होऊ नये यासाठी घेण्यात येणारी खबरदारी, जी मुले व नातेवाईक आपल्या वृद्धांची देखभाल करत नाहीत त्यांच्यावर करण्यात येणारी कारवाई, हेल्पलाईन १०९०, ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याण निधीची स्थापना, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व कायदेशीर तरतुदी तसेच वृध्दाश्रम योजनेबाबतची  माहिती श्री. बडोले यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००



No comments:

Post a Comment