Saturday, 1 September 2018

ग्रंथ यादीतील ग्रंथाबाबत सूचना/हरकती/आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन


मुंबई, दि. 1 : ग्रंथालय संचालनालय आणि राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत 43 व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथाची यादी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथाबाबत ‍सूचना/हरकती/आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक यांनी केले आहे.
सन 2016 मध्ये प्रकाशित आणि संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथापैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीने निवड केलेल्या 865 ग्रंथाची यादी (मराठी 600, हिंदी 165, इंग्रजी 100) राज्य शासनाच्या संकेतस्थळावर 1 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या काळात अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. या ग्रंथ यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबतची सूचना/हरकती/आक्षेप असल्यास 20 सप्टेंबर 2018 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, मुंबई 23 यांच्या नावे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने, टपालाने अथवा उपरोक्त नमूद केलेल्या ईमेल वर पाठवावेत. याचबरोबर यादीत ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक आणि किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी कळविले आहे.
००००

No comments:

Post a Comment