Saturday, 1 September 2018

अचूक व विश्वासार्ह माहितीचे भांडार म्हणजे लोकराज्य - विभागीय ग्रंथपाल विभा डांगे







                             * लोकराज्य दुर्मिळ विशेषांकाचे ग्रंथालयात प्रदर्शन
             नागपूर, दि. 1 :   अचूक व विश्वासार्ह माहिती हे लोकराज्य मासिकाचे वैशिष्ट्य असुन माहितीचे भाडांर म्हणजे लोकराज्य मासिक असल्याचे मत  विभागीय ग्रंथपाल वि. भा. डांगे यांनी आज व्यक्त केले.
येथील विभागीय ग्रंथालयात आज दुर्मिळ लोकराज्य अंकाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाच्या उदघाटनपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी  माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, विभागीय माहिती केंद्रातील जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, सहाय्यक संचालक, ग्रंथालय मिनाक्षी कांबळे, अभय देशमुख उपस्थित होते.  
            लोकराज्य  मासिकातील माहिती ही शासनाची अधिकृत माहिती असते. अलिकडच्या अंकांमधून ही माहिती रंजकपणे व आकर्षकरित्या वाचकापर्यंत पोहोचविण्यात येते, असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी या मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लोकराज्यच्या दुर्मीळ अंक प्रदर्शनातून महाराष्ट्राच्या इतिहासाची ओझरती झलक पाहता येईल. वाचकप्रिय व वाचनीय अंक हे लोकराज्यचे वैशिष्ट्य असल्याचे सांगून राधाकृष्ण मुळी म्हणाले की, महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र वा‍र्षिकीने संदर्भमूल्य मोठे आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग घ्यावा.
            लोकराज्य मासिकामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना संदर्भ उपलब्ध होतात व अलिकडील लोकराज्यचे अंक पाहता त्यांना उत्तम संदर्भ मिळत असल्याचे ग्रंथालय सहाय्यक संचालक, मिनाक्षी कांबळे यांनी सांगितले.  लोकराज्य वाचक अभियानाविषयी यावेळी  जिल्हा माहिती अधिकारी, अनिल गडेकर यांनी  माहिती दिली. लोकराज्य हे देशातील द्वितीय क्रमांकाचे मासिक असून  लोकराज्यच्या वाचन परंपरेवर  त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी शैलजा दांदळे याचे भाषण झाले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात वाचकवर्ग उपस्थित होता.
*****
शैलजा वाघ दांदळे

No comments:

Post a Comment