नागपूर, दि. 1 : जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी पाचगाव येथे शौर्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी पाचगांवचे सरपंच श्रीमती पुन्यशिला मेश्राम व उपसरपंच रामजी हटवार, वीर पत्नी श्रीमती शालिनीताई गायकवाड, माजी सैनिक श्री. कुर्व, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा मोटे तसेच जिल्हा सैनिक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक व गावकरी आदी उपस्थित होते.
सर्जिकल स्ट्राईक हे भारतीय सैन्यासाठी अतिशय मनोबल वाढविणारी घटना असून यात सैन्याच्या पराक्रमामुळे देशाची व प्रत्येक नागरिकाची मान अभिमानाने ताठ झाली असून मेजर सोहित सुदी (शौर्य चक्र प्राप्त), लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 28 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक रात्री पार पडली, असे सैनिक कल्याण अधिकारी दीपक लिमसे यांनी यावेळी सांगितले.
‘अचूक वार आणि झिरो नुकसान’ची अंमलबजावणी करुन पाकिस्तानी सीमारेषेत जाऊन आतंकवाद्यांचे जवळपास सात तळ उद्ध्वस्त केल्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी पाचगावच्या सरपंच श्रीमती पुन्यशिला मेश्राम यांनी शालेय मुलांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले.
यावेळी वीर पत्नी श्रीमती शालिनीताई गायकवाड, माजी सैनिक श्री. कुर्व, संजय पाहाडे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा सैनिक कार्यालयाचे श्री. अशोक घटे यांनी केले.
*****
No comments:
Post a Comment