नागपूर दि 1 : शालेय शिष्यवृत्ती योजनांच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे बॅंक खाते व आधार क्रमांक यांचे लिंक करा. विविध शालेय शिष्यवृत्ती योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्याना थेट त्यांचे बॅंक खात्यावर मिळण्याचे दृष्टीने शासन निर्देशानुसार संबंधित विद्यार्थ्याचे खाते त्यांचे आधार क्रमांकास संलग्न असणे आवश्यक आहे. तेव्हा सर्व संबंधितांनी यांची नोंद घेवून विद्यार्थ्याचे आधार क्रमांक खाते क्रमांकास संलग्न करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करून त्याबाबतची बॅंक-आधार लिंक पावती संबंधित बॅंकेच्या शाखेकडून प्राप्त करून घ्यावी. त्याची प्रत पुढील सर्व संदर्भासाठी जपून ठेवावी. त्याचप्रमाणे यापूर्वी मंजूर झालेल्या परंतु आधार लिंकिंग नसल्यामुळे प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्तीबाबत संबंधित शाळांनी विद्यार्थ्याचा आधार लिंकिंग पावती व आवश्यक कागदपत्रांसहीत तात्काळ समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment