मुंबई, दि. 31 : लोहपुरुष, देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लिक, कक्ष अधिकारी ललित सदाफुले, सचिन इंगळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त व जयंतीनिमित्त उपस्थितीतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ दिली.
000
No comments:
Post a Comment