मुंबई, दि. 31 : भारताचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्व. पटेल आणि स्व. गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्त शपथ दिली.
या कार्यक्रमास आमदार प्रतापराव चिखलीकर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपिन मल्लिक, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार,सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव छाया वडते यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment