Monday, 1 October 2018

गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पदयात्रा



नागपूरदि.  :  महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त उद्या मंगळवार, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 7.30 वाजता गजानन नगर येथून पदयात्रा करणार आहेत.
 पदयात्रेत महापौर श्रीमती नंदा जिचकार, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, प्राध्यापक राजीव हडप, रमेश भंडारी तसेच नगरसेवक व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सकाळी 7.30 वाजता गजानननगर सभागृहापासून पदयात्रेला सुरुवात करतील.  प्रियंकावाडी, छत्रपती सभागृह, जनता हायस्कूल, रिंग रोड प्रगती कॉलनी, तांबे हॉस्पिटल, वर्धा रोड, गजानन मंदिर, बौद्ध विहार मार्ग, देवनगर चौक, नेहरु नगर, कसबेकर चौकातून नरगुंदकर, अमर एन्क्लेव्ह वृंदावन, गजानन नगर सभागृह येथे पदयात्रेचा समारोप होईल.
****

No comments:

Post a Comment