नागपूर, दि 31 : लोहपुरुष, देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी प्रधानमंत्री
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी
त्यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन अभिवादन केले.
यावेळी
उपायुक्त सुधाकर तेलंग, संजय धिवरे, के. एन. के. राव, प्रादेशिक चौकशी
अधिकारी शैलेंद्र मेश्राम, श्री राठी,
सहायक आयुक्त मनीषा
जायभाये, नायब तहसिलदार
सुजाता गावंडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरदार वल्लभाई पटेल
यांच्या जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जात आहे या दिनानिमित्त
आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ दिली.
*****
No comments:
Post a Comment