नागपूर, दि 31 : लोहपुरुष, देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी प्रधानमंत्री
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अश्विन
मुदगल यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन अभिवादन केले.
यावेळी
अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खजांजी,
उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, श्रीमती सुजाता गंधे, श्रीमती राजलक्ष्मी शहा,
श्रीमती विजया बनकर, रविंद्र कुभांरे, श्री कडू, श्री. कातकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते. सरदार वल्लभाई पटेल यांच्या
जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जात आहे या दिनानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी
राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ दिली.
****
No comments:
Post a Comment