नागपूर, दि. 30 : महालेखाकार विभागाच्या वतीने जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असून,यानिमित्त तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महालेखाकार यांच्या मुख्य कार्यालयातील पेन्शन शाखेच्या प्रशिक्षण सभागृहात बुधवार दि. 31 ऑक्टोबर व 1नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 5 वाजता सेवानिवृत्ती शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पेन्शनविषयक तक्रारी नोंदविण्यात येणार असून पेन्शनविषयक गाऱ्हाणी ऐकल्या जातील. तसेच विविध शासकीय कार्यालयात कार्यरत लेखा व कोषागारे विभागाचे काम पाहणा-या कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शासकीय व कोषागारे विभागाच्या तसेच 1 व 2 नोव्हेंबर रोजी शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखा व कोषागाराचे कामकाज सांभाळणा-या अधिकारी कर्मचारी यांना विभागाच्या मुख्य इमारतीतील मल्टीपर्पज हॉलमध्ये भविष्य निर्वाह निधीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्याबाबतच्या तक्रारी व गाऱ्हाणी तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
तरी जास्तीत -जास्त सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचारी विद्यमान कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment